पावणे तेरा लाख मतदार निवडून देणार महानगरपालिकेचा नवा कारभारी

Cityline Media
0
प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत ७४ हरकती

नाशिक दिनकर गायकवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेसाठी बुधवारपर्यंत  ७४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. गुरुवारी हरकती घेण्याची मुदत संपुष्टात येत आहे.दरम्यान, अखेरच्या दिवशी किती हरकती येणार याचे चित्र गुरुवारी स्पष्ट होणार आहे.
साडे तीन वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी पावणे तेरा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावून नवे कारभारी महापालिकेत निवडून देणार आहे.जानेवारीत महापालिकेची निवडणूक होणार असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

शासनाने २०१७ प्रमाणेच जैसे थे प्रभाग रचना ठेवल्याने चार सदस्यीय प्रभाग रचनेबरोबर ३१ प्रभाग कायम ठेवले.प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लोकसंख्येनुसार आरक्षण करावे व पिंपळगाव खांबचा परिसर प्रभाग २२ व प्रभाग ३१ अशा दोन ठिकाणी विभागला असून हा परिसर प्रभाग ३१ मध्येच ठेवावा. अशी हरकत घेतली आहे.

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी प्रभाग २६ व २७ वर हरकत घेतली.हरकत नोंदवण्यासाठी प्रशासनाने मुख्यालयासह सिडको,सातपूर, मनपा उद्यापासून लगेचच सुनावणी ज्या काही हरकती पालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यांच्यावर शुक्रवार दि. ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.

नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या विभागीय कार्यालयांमध्ये गुरुवार पर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भागातील हरकती आल्या आहेत त्याबाबत निवडणूक कक्षातील कर्मचाऱ्यांकडून अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

प्रभाग क्र. १३ मधील श्रमिक नगर, गंजमाळ,झनकार हॉटेल परिसर, एन.डी.पटेल रोड, पंचशिल नगर, रॉयल हेरिटेज हॉटेल परिसर, जी.पी.ओ. समोरील रसूलबाग कब्रस्तान, जुना सिव्हिल येथील वस्ती व ठाकरे गल्ली,भद्रकाली परिसरातील मातंगवाडा व तलावाडी परिसर किस्मतबाग कब्रस्तान येथील वस्ती सदर परिसर प्रभाग क्र. १४ मध्ये समाविष्ट करून तेथील नागरिकांना अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या प्रभागात सामावून घ्यावे, अशी मागणी शिंदेसेनेचे पदाधिकारी दीपक डोके यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!