दलित विकास महासंघाचे विभागीय आयुक्तांकडे तक्रार निवेदन सादर
नाशिक दिनकर गायकवाड येथील महानगर पालिकेने सफाई ठेका आऊट सोर्सिंगला देऊन जाणीवपूर्वक पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर अन्याय केल्याने महानगर पालिकेच्या या निर्णयामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे त्याचाच एक भाग म्हणून येथील विभागीय आयुक्त यांना दलित विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास तेलोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हा निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनादनात म्हटले आहे की, 'नाशिक महानगरपालिका, यांचे मार्फत सफाई आऊट सोर्सेटचा ठेका एका कंपनीला देण्यात येत आहे. यामुळे येथील स्थानिक मागासवर्गीयांवर, बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे. त्यामुळे नाशिक मनपाने देऊ केलेला आऊट सोर्सिंगचा सफाई ठेका देणे ताबडतोब थांबवावा.त्यामुळे जे सफाई कामगार येथे भरती होणार आहे त्यांचे भवितव्य हे अंधारमय होणार आहे.
सफाई ठेक्यांची मुदत असेल तेवढ्याच दिवस या सफाई कामगारांना काम मिळणार आहे. त्या नंतर हे सर्व कामगार पुन्हा बेरोजगार / बेकार होणार आहे.सफाई कामगारांना ठरवुन दिलेला पगार व प्रत्यक्षात दिला जाणारा पगार या तफावत असणार आहे.सफाई कामगारांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार नाही.त्यामुळे त्यांना अनेक आजारांची लागन होण्याची शक्यता आहे.
या कंत्राटी सफाई कामगारांना केंद्र / राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणा-या सुविधा / लाब मिळणार नाही.संबंधित कामगारांच्या कुटुंबियांचे देखील भविष्य अंधारात येणार नाही. त्यातच कुटुंबियांचे, आरोग्य, शिक्षण इत्यादी प्रश्न.संबंधित सफाइ ठेक्याची मुदत संपल्या नंतर सर्वच्या सर्व कंत्राटी कामगार हे बेकार होणार आहे. त्या पैकी काही कामगार हे वयोमर्यादा ओलांडणार आहे. त्या नंतर त्यांना कोणीही काम देणार नाही.
या सर्वच कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाम्चे भवितव्य सर्वतोपरी खराब होऊन कायमचे नुकसाण होणार आहे.
सदर या कंत्राटी भरती मध्ये जास्तीत जास्त कामगार हे मागासवर्गीय असणार आहे.त्या मुळे वरील सर्व गोष्टी / घटनांचा विचार करत असतांनाच नाशिक मनपाने ही भरती न करता सफाई कामगारांची कायम भरती करावी व कंत्राटी मागासवर्गीय कामगार व कायम भरती करण्यास कंत्राटी कामगारांबरोबरच सर्व मागासवर्गीयांना संधी मिळून त्यांच्यावर अन्याय न होता त्यांना न्याय मिळेल जर सदरची आऊट सोर्सिंगद्वारे सफाईचा ठेका दिला गेला तर नाशिक मनपाला त्याचे परिणाम भोगावे लागतील तसेच दलित विकास महासंघाच्या वतीने सर्व प्रकारचे आंदोलने छेडण्यात येतील.
निवेदनावर दलित विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास तेलोरे,जिल्हा सचिव भास्कर साळवे,गणेश घोडेराव, शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राहुल ताजनपुरे किरण हिरे, गोविंद कागडे,किरण लोखंडे, रविंद्र निकाळे, बिपिन मोहिते यांच्या सह्या आहेत.
