दि कळवण मर्चंट्स को-ऑप बँकेच्या तिसऱ्या शाखेचे कनाशीत लोकार्पण.

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दि कळवण मर्चेंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तिसऱ्या शाखेचे उदघाटन कनाशी येथे प. पू. संत स्वामी अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार होते.यावेळी प. पू. संत स्वामी अनेकरूपी महाराज यांनी सांगितले की, कमको बँक ही समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. ग्रामीण व आदिवासी बांधवांना आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी या शाखेचा मोठा हातभार लागेल. बँके थी ही बाटचाल सर्वांसाठी मंगलमय ठरो, हीच शुभेच्छा. आ. नितीन पवार यांनी सांगितले की, कनाशी सारख्या ग्रामीण भागात बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे शेतकरी,

व्यापारी व सर्वसामान्य बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. गावागावातील लोकांना आता कर्ज, ठेवी, आर्थिक व्यवहारांसाठी कळवण शहरात धाव घ्यावी लागणार नाही. संचालक मंडळाने ग्रामीण भागाचा विचार करून घेतलेला हा निर्णय निश्चीतच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी कमको बँकेचे चेअरमन प्रवीण संबेती, उपाध्यक्ष धनंजय अमृतकर, जनसंपर्क संचालक पोपट बहिरम,जेष्ठ संचालक गजानन सोनजे, संजय मालपुरे, योगेश महाजन, डॉ. धर्मराज मुर्तडक, रंगनाथ देवघरे, विनोद मालपुरे, नितीन बालखडे, सतीश कोठावदे, दीपक वेढणे, सागर शिरोरे, लक्ष्मण खैरनार, सुभाष शिरोडे, संचालिका शालिनी महाजन,भारती कोठाबदे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!