लातूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी नुकतीच पाहणी केली तसेच शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला, त्यांची व्यथा जाणून घेतली.
उभं पीक पाण्याखाली गेलंय आणि शेतीच्या बांधावरून बळीराजा मदतीसाठी सरकारकडे आक्रोश करतोय पण सरकार मात्र मदतीची कोणतीच ठोस शाश्वती देत नाहीय, अशावेळी बळीराजाने करायचं काय?
ह्या दौऱ्या दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी उपस्थित होते.
