अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या क्यू आर कोडचे नामदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, येथे नुकतेच 'अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहिल्यानगर' यांच्या सन २०२४-२०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डीले,आमदार श्रीमती मोनिका राजळे,आमदार श्री.विठ्ठलराव लंघे, मा. खासदार डॉ.सुजय विखे, बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, सर्व विद्यमान संचालक आण्णासाहेब म्हस्के,चंद्रशेखर घुले.भानुदास मुरकुटे,.सीताराम गायकर,अमोल राळेभात,.अंबादास पिसाळ,.विवेक कोल्हे, श्रीमती गीतांजली शेळके,.प्रशांत गायकवाड.करण ससाणे,.गणपत सांगळे, श्रीमती अनुराधा नागवडे, तज्ञ संचालक.मधुकर नवले.सुरेश साळुंके,.प्रेमराव भोईटे, मा. संचालक.रावसाहेब शेळके यांच्यासह बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

ही सभा बँकेच्या कामकाजातील केवळ एक वार्षिक परंपरा नसून, संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार चळवळीला नवी दिशा देणारी, भविष्यातील कामकाजाचा आराखडा निश्चित करणारी आणि संस्थेच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेणारी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली. सभेत सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवाल, आर्थिक कामगिरीचा आढावा तसेच आगामी वर्षासाठी ठरविण्यात आलेल्या धोरणात्मक योजना यामुळे बँकेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि विकासक्षम दृष्टीकोन अधोरेखित झाला.

याप्रसंगी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून बँकेच्या क्यू आर सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ही सेवा म्हणजे बँकेच्या डिजिटायझेशनच्या प्रवासातील एक मोठी झेप असून,व्यवहार अधिक वेगवान,सुरक्षित व सोयीस्कर करण्यासाठी ही तंत्रज्ञान संपन्न योजना ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. क्यू आर सेवेच्या माध्यमातून आता व्यवहार करताना वेळेची बचत होईल तसेच ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना अत्याधुनिक डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळेल.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार.शिवाजी कर्डीले व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे कार्य नेहमीच शेतकरी हिताचे राहिले आहे. शेतकऱ्यांना गायींचे कर्ज, म्हशींचे कर्ज, महिलांना बचत गट कर्ज आदी योजनांच्या माध्यमातून जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बँक सदैव पुढाकार घेत असते.

महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी ११ लाखांची भरीव मदत जाहीर करण्यात आली. या स्तुत्य निर्णयाबद्दल व समाजाभिमुख दृष्टिकोनाबद्दल बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!