नाशिक दिनकर गायकवाड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चक्क शेतकऱ्यांच्या शेतातील माती वापरल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथील शिलापूर येथे एका कार्यक्रमासाठी येणार असल्याने नाशिक एअरपोर्ट ते दहावा मैल या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.
सार्वजनिक बांधकामविभागाकडून तातडीने खड्डे बुजवण्यात आले.परंतु सदरचे खड्डे बुजवण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती शेतकऱ्याला न विचारता उचलून खड्डे बुजविण्यात आले.यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे रस्त्याच्या कडेला माती न मिळाल्याने अक्षरशा खड्डे चिखलाने बुजवण्यात आले होते. त्यामुळे चार ते पाच दुचाकी स्वारांचा घसरून अपघात झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. छाया रेखांकन प्रकाश कदम
