आश्रम शाळांच्या समस्या बाबत विद्यार्थी विकास संघटनेचे मंत्री झिरवाळांना निवेदन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड राज्यातील वसतिगृह सुरक्षित करण्यात यावे यासह वसतिगृहातील विविध अडचणीबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेने अध्यक्ष नितीन बोडारे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले.
सध्या राज्यातील आश्रमशाळा अनेक अडचणीशी सामना करत आहे. या अडचणीबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेने मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या समोर पाढाच वाचला. हा प्रश्नखूपच गंभीर आहे. या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन झिरवाळ यांनी दिले. यावेळी संघटनेचे कैलास गायकवाड, गणेश भडदिवे, निकेतन जाधव, शशिकांत शार्दूल,शिवा शार्दूल, अमन तिवारी आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!