विश्व हिंदू परिषदेकडून श्रीगणेशाचे विधीपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जन

Cityline Media
0
संगमनेर विशाल वाकचौरे विश्व हिंदू परिषद, 
बजरंग दल,मातृशक्ती, दुर्गावाहिनी तसेच संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून संगमनेर शहरातील हजारो घरगुती गणरायांचे तसेच मानाच्या सार्वजनिक गणरायांचे विधीपूर्वक पूजन करून विसर्जन वाहत्या पाण्यात केले.
महादेव घाट व गंगामाई घाट येथे मोठ्या गणरायांचे तसेच पहिला घाट व बनविलेल्या बोटींच्या साहाय्याने विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.सकाळी ८ ते रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दरवर्षी पाण्यात बुडून २-३ जणांचा मृत्यू होतो,त्यामुळे बजरंग दलाने १० वर्षांपासून लाईफ जॅकेटसह तराफा बोटींच्या साहाय्याने सुरक्षित विसर्जनाचा ध्यास घेतला,त्याला भाविक व प्रशासनाने त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाने नदीला पुराची परिस्थिती असल्याने प्रवरानदी घाट परिसरात गर्दी होवू नये, म्हणून शहरातील काही ठिकाणी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी नियोजन केले होते, मात्र कृत्रिम हौद यांच्याकडे गणेशभक्तांनी पाठ फिरवली.

धर्म शास्त्राप्रमाणे श्रीगणेश भक्तांनी वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी संगमनेर शहरासह परिसरातील गणेश मंडळे, माहेश्वरी समाजाचे युवा महेश, रोटरी क्लब यांचे सहकार्य लाभले, 
संगमनेर प्रांताधिकारी,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधीक्षक, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक, तहसीलदार,मुख्याधिकारी, संगमनेर विधानसभा आमदार अमोल खताळ यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे यावेळी कौतुक केले.

यावेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाचे विशाल वाकचौरे,गोपाल राठी, सचिन कानकाटे, कुलदीप ठाकूर,श्रीकांत मोरे,सुरेश कालडा,शुभम कपिले,संदीप वारे,अजिंक्य डोंगरे,किशोर गुप्ता,आदित्य गुप्ता,कृष्णा डंबीर,वैभव मेहेत्रे,प्रसाद थोरात, रवी मंडलिक,अश्विन बेल्हेकर, किरण पाचारणे, प्रणव सस्कर, सुमित वर्मा,गौरव वराडे,साई ठाकूर, सनी विश्वकर्मा,धनंजय मच्या, ओंकार डावखरे,श्लोक मुळे, आदित्य रुपवते,ओम सातपुते, शेखर वामन,आकाश बनकर, प्रतीक डोखे, सागर पाटील,साई गुप्ता तसेच दुर्गावाहिनीच्या सौ.शामल बेल्हेकर,ॲड.सोनाली बोटवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!