भगवती एज्युकेशन सेंटर मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

Cityline Media
0


संगमनेर विशाल वाकचौरे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन भगवती एज्युकेशन सेंटर, मालदाड रोड,संगमनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश आहेर यांनी केले. अकॅडमीचे संचालक.संदीप रच्चा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचे योगदान,विद्यार्थ्यांच्या जीवनातील त्यांचे स्थान आणि गुरुजनांविषयी आदर का?आवश्यक आहे यावर प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमात विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांबद्दल एक मिनिट बोलण्याची संधी मिळाली.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या अध्यापन शैलीचे, समर्पित मार्गदर्शनाचे व सहृदयतेचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमात शिक्षिका सौ.विद्या, सौ.सुरेखा, सौ.रूपाली, सौ.श्वेता आणि सौ.भाग्यश्री यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला मॅडम,प्रज्ञाताई आणि श्रीनिवास सर यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी गणेशोत्सव व शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पेढारूपी मोदकाचा प्रसाद देण्यात आला.एकंदरीत, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयीचा आदर, आपुलकी आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!