नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी शहरातील सार्वजनिक मंडळांनी सकाळी ११ वाजेपासून सजवलेल्या रथावर श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करत मिरवणुकीस प्रारंभ केला होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या संवाद्य मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.
काही मंडळांनी सातव्या, आठव्या, नवव्या व दहाव्या दिवशी श्री मूर्तीचे विसर्जन केले होते. ना. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट, पालखेड रोडचा राजा मरीमाता मित्रमंडळ, शिवाजीनगरचा राजा साई मित्रमंडळ, वक्रतुंड मित्र मंडळ, आदर्श सामाजिक, सांस्कृतिक मित्रमंडळ, गजवक्र मित्र मंडळ, मोरया मित्रमंडळ, समर्थ फ्रेंड सर्कल, रॉयल ग्रुपचा राजा मित्र मंडळ, न्यु फाईव्ह स्टार मित्रमंडळ, ५ स्टार मित्रमंडळ, युवा गणेश मित्रमंडळ, कादवा नगर फ्रेंड सर्कल ग्रुप,रामेश्वरी २३८ मूर्ती संकलित केल्या.
दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने 'माझी वसुंधरा पर्यावरणपूरक' गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले. श्री मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाच ते सहा ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. या अभियानात २३८ मुर्तीचे संकलन करण्यात आले होते. यावेळी गणेशभक्तांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. या
मित्र मंडळ, नागेश्वर मित्रमंडळ, साईश्रध्दा सांस्कृतिक कला व क्रिडा मित्र मंडळ यांच्यासंह शाळा, महाविद्याल, य, कॉलेज,अकॅडमी आदी मंडळांच्या मिरवणूका ढोल ताशांच्या गजरात नाचत गणेश भक्तांनी एकच जल्लोष केला. विसर्जन मिरवणूकीत मोठ्या संख्येने तरुणी सहभागी झाल्या होता. फुलांबरोबर
यंदा गुलालाची उधळण झाल्याने मिरवणूक मार्ग गुलाबी रंगाने नाहुन निघाला होता. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
