आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील वैभव कोचिंग क्लासेसच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी या निमित्ताने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कामकाज केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार सोमनाथ डोळे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे लोणी येथील प्रवरा एक्सलन्सचे प्रा.सुरज निर्मळ होते.त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रा. गौरव तांबे व प्रा. खळदकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. सतीश वाणी,प्रा. खळदकर, प्रा.तांबे, प्रा.शुभम चौधरी, प्रा.तांबे रोहन, प्रा.सायली हारदे,प्रा. अनुराधा वाणी, पुनम चौधरी, वैशाली वाणी आदींचा पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही शिक्षक व कर्मचारी म्हणून उत्कृष्ट काम केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शुभम चौधरी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाच्या संधींबद्दल विचार मांडले. प्रमुख पाहुणे प्रा. सुरज निर्मळ यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना सीईटी,जेईई व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात पत्रकार सोमनाथ डोळे यांनी शिक्षकांचे कार्य, नैतिक व सांस्कृतिक मूल्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
क्लासच्या वतीने आदर्श व उत्कृष्ट शिक्षक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यात प्रथम क्रमांक घोलप संचिता, द्वितीय थोरात शुभांगी, तृतीय वाणी कार्तिक तर उत्तेजनार्थ फंड विनीत व कानडे मानसी यांचा गौरव झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोळगे अनुराधा, निकिता थोरात व श्रुती भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सतीश वाणी यांनी केले.
