सांस्कृतिक दहशतवाद्यांकडून नाशिकच्या पत्रकारांना झालेल्या मारहणीचा राज्यात सर्वत्र निषेध

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे नियमितपणे वृत्तांकनासाठी जात असताना,स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील सांस्कृतिक दहशतवाद्यांनी नाशिक मधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे,अभिजीत सोनवणे यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये किरण ताजणे व अभिजीत सोनवणे यांना जबर मार लागला.
या घटनेचा राजकीय पक्ष,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध केला आहे.जखमी किरण ताजणे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत आम्ही पाठीशी असल्याचे सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मारहाण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना दिल्या, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे गेले असता स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अडवण्यात आले. पत्रकार बांधवांनी आपली ओळख देऊन

बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. यावेळी तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर पत्रकार गाडीच्या खाली उतरल्यावर पत्रकार

खरे,सोनवणे, ताजणे यांना जबर मारहाण केली. मुंबईवरून नाशिकच्या दिशेने येत असताना मंत्री छगन भुजबळ यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संबंधित पत्रकारांना तातडीने नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात यावे, अशा सूचना केल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी चांगली वागणूक दिली जावी. कारण येथून परत जाताना त्यांनी नाशिक विशेषतः त्र्यंबकेश्वरविषयी चांगल्या गोष्टी, चांगले गुणगान गावे, याकरिता प्रयत्न झाले पाहिजे. मात्र प्रत्यक्षात येथे गुंडगिरी वाढत असून पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असून त्यांच्यावर कारवाई केली जावी, असे खा. राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बाजार मांडला आहे. प्रत्येक

त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट करणे, मारहाणीच्या घटना वाढतच आहेत. मात्र येथील गुंडगिरी प्रवृत्तीच्या तरुणांनी कहर केला. त्र्यंबकेश्वरमध्ये माफिया तयार झाले आहेत. शनिवार, रविवारी या ठिकाणी आलेल्या यात्रेकरूंची अक्षरशः लूट केली जाते. या घटनेच्या माध्यमातून येथे कोणकोणता कर कसा घेतला जातो, या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन शासनाकडे मी यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगत आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

काम ठेकेदारामार्फत केले जात असल्याने त्याच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे असून या ठेकेदार पद्धतीमुळे तेथे गुंडगिरी वाढली असून याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, असे सदस्य ललिता शिंदे यांनी सांगितले.

पत्रकारांना मारहाण झाल्याचे समजताच मी आमचे काही पक्षाचे पदाधिकारी घटनास्थळी पाठवले. प्रथम किरकोळ घटना वाटली, मात्र सांगून सुद्धा पत्रकारावर हल्ला करणे चुकीचे असून संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!