साई संजीवनी को-ऑपरेटिव्ह बँक आणि पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Cityline Media
0
कोपरगाव प्रतिनिधी येथील साई संजीवनी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, या संस्थेची २९ वी आणि संजीवनी सह.पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा   ‌नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी,अध्यक्ष म्हणून बिपिन कोल्हे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या प्रसंगी,छत्रपती शिवाजी महाराजांना आणि सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून,सभेची सुरूवात झाली.

या प्रसंगी,मार्गदर्शन करून,साई संजीवनी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व संजीवनी सह. पतसंस्था यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच एकजुटीने आणि परस्पर सहकार्याने आपण आणखी उंची गाठू शकतो.सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाची दूरदृष्टी
आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा यांच्या जोरावर साई संजीवनी को-ऑपरेटिव्ह बँक आणि संजीवनी सह.पतसंस्था निश्चितच अधिक प्रगती करेल,असा  विश्वास व्यक्त केला आणि मनोगत व्यक्त करून सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानले!!

याप्रसंगी, माजी संचालक अरुण येवले, संचालक  मनीष गाडे,  माजी संचालक  शिवाजी वक्ते, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक श्री त्रंबकराव सरोदे, संचालक सतीश आव्हाड,पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील बंब, संचालक रमेश घोडेराव,  अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान ,श्री टुपके,टीडीबी संचालक विलास कुलकर्णी, माजी संचालक कैलासराव माळी, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे,सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सह. साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, मा. संचालक गुलाबराव वरकड तसेच, संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!