संगमनेर मधून सुरू होतेय मत चोर गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी मतचोरीवरुन काँग्रेसचे खासदार,विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रान उठवलं आहे.पत्रकार परिषदा घेऊन मतदार याद्या, लोकसभेसाठी झालेले मतदार, यातील गैरप्रकार हे उघडकीस आणत केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे.त्यानंतर आता निवडणूक आयोगाने मतदार याद्यांबाबत मोठा निर्णय घेतला असला हि मतचोरी झालीच कशी हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे मतचोरी संविधान द्रोही कृत्य असुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने मत चोर गद्दी छोड हे स्वाक्षरी अभियान सोमवार २९ सप्टेंबर रोजी संगमनेर येथुन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हाध्यक्ष बंटी यादव म्हणाले की अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस,सदस्य, तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,तालुका व शहर सर्व पदाधिकारी,यांना कळविण्यात येते की माजी

 मंत्री,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मा.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत,व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष .डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक प्रियंका रणपिसे,प्रदेश काँग्रेसचे जनरल सचिव संजय भोसले साहेब यांच्या उपस्थितीत,

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची जिल्हा आढावा बैठक, व "मत चोर, गद्दी छोड " या विषयावर स्वाक्षरी मोहीम राबवणार आहोत
तरी सोमवार दिनांक २९ सप्टेंबर  रोजी सकाळी ११:०० वाजता, संगमनेर  येथे आयोजित केली असून तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!