अहिल्यानगर प्रतिनिधी चास घाटाजवळ नगर - पुणे रोडवर दरोड्याचे तयारीत असलेला कुख्यात गुंड त्याचे इतर चार साथीदार, ७,९०,६००0 रू.किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद केले असून जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हरिष भोये,पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले,ह्दय घोडके,दिपक घाटकर,राहुल द्वारके,सुरेश माळी,अतुल लोटके,भिमराज खर्से,बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड,राहुल डोखे, सोमनाथ झांबरे,भगवान थोरात, विशाल तनपुरे,योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
नुकतेच तपास पथक नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सपोनि हरिष भोये यांना खबऱ्या मार्फत अहिल्यानगर ते पुणे जाणारे रोडवर चास घाटाजवळ एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन क्रमांक एम. एच. ०१.व्ही. ए. ७४२२ हिचे मधुन गौरव घायाळ व त्याचेबरोबर ३ ते ४ इसम दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली.
पथकाने त्या ठिकाणी रात्री साडेतीनच्या सुमारास जावुन खात्री केली असता चास घाटाच्या अलीकडे एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन क्रमांक एम.एच.०१. व्ही. ए. ७४२२ रोडचे कडेला अंधारामध्ये थांबल्याचे दिसुन आले.
पथकानी सदर इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) गौरव हरीभाऊ घायाळ वय-२४ वर्षे रा. सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर, २) सतिष बाळासाहेब पावडे वय-३५ वर्षे, मुळ रा. दरोडी, ता. पारनेर हल्ली रा. सुपा, ता.पारनेर, जि. अहिल्यानगर,
३) अनिकेत रमेश साळवे वय-२९ वर्षे रा.ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर,४) विशाल सुरेश जाधव वय-२३ वर्षे रा.अपधुप रोड, सुपा, ता. पारनेर जि. अहिल्यानगर,५) गोविंद बबनराव गाडे वय-३६ वर्षे रा. ग्रामपंचायत मागे, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काही एक समाधान कारक उत्तर दिले नाही. पथकाने पंचासमक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात ३०,००० रु किमतीचे १ पिस्टल व १ जिवंत काडतुस, ५०० रुपये किमतीचे १ तलवार, १०० रु कि.चे १ गिलव्हर, १ बेसबॉलचा दांडका, ६००००-रुपये किमतीचे ६ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ७,००,००० रु किमतची एक इनोव्हा चारचाकी वाहन,असा एकुण ७,९०६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी नामे १) गौरव हरीभाऊ घायाळ वय-२४ वर्षे रा.सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस ठाणे गुन्हा र.नंबर व कलम
१). पारनेर ;गु.र.नं. २६३/२०१८ भा.द.वि. कलम ३२४,३२३,३४२५०४,५०६,३५
२) सुपा गु.र.नं.४४/२०१९ भा.द.वि. कलम ३५३,३३२,३३७
३). सुपा गु.र.नं. ३७/२०२० भा. द.वि. कलम ३२७,५०४,५०६
४) सुपा गु.र.नं. ६२/२०२३ भा.द.वि. कलम २९४,३२३,५०४,५०६
५) सुपा गु.र.नं. ६३/२०२३ भा.द.वि. कलम ३५३,३३२,३३३,३३७
६ सुपा गु.र.नं. ४२१/२०२४ भा.द.वि. कलम ३२४,३२३,५०४,५०६
७) एमआयडीसी गु.र.नं. ५३०/ २०२४, भा.द.वि. कलम ४३५
८) सुपा गु.र.नं. ३२३/२०२४ म.पो.का. कलम १४२
९) सुपा गु.र.नं. १८३/२०२ ५०/ भा.न्या.सं. कलम ७४, १८९(२), १९१(२), १९०, ११५३५२ ३५१(२) सह अ.जा.ज.का. कलम ३(१)(आर),
३(१)(एस), २(२)(ऐ), ३(३)(डब्ल्यू )(आय)
वर नमूद आरोपी यांचेविरुध्द विरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.८२९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१० (५), ३१०3(६), आर्म ऍ़क्ट ३/२५ ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील एकुण ७,९०,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
