खासदार सुनिल तटकरे यांना लंडन मध्ये भारत भुषण पुरस्कार प्रदान

Cityline Media
0
रायगड प्नतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनिल तटकरे यांना लंडन येथे पार एका भारतीय वृत्तपत्राने पार पडलेल्या कन्वेन्शन' मध्ये 'भारत भूषण' हा सन्मान प्राप्त झाला.
या गौरवाबद्दल रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्वराज्यभूमी रायगडमधील कर्जत येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान त्यांना लाभला.

रायगड जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी खासदार तटकरे  नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.रोहा स्किल डेवलपमेंट सेटर, पर्यटनवाढीसाठी बीच डेव्हलपमेंट, प्रसाद योजने अंतर्गत हरिहरेश्वर, दिवेगार येथे अवकाश निरीक्षण, शैक्षणिक विकासासाठी ‘प्रोजेक्ट उज्वल’, मुंबई - गोवा हायवेवर सेवा रस्ते व रस्ते सुधारणा, रोजगारवाढीसाठी औद्योगिक क्षेत्रातील विकासाच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्यास विकासाचे माॅडेल म्हणून सार्थ ठरविले आहे.

यावेळी  प्रफुल्ल पटेल, मा.मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर,  आदिती तटकरे, सौ. वरदा सुनिल तटकरे, आनं परांजपे, तुकाराम सुर्वे, अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर धारे, मुश्ताक अंतुले, दत्ताजी मसुरकर, प्रविण पाटील, भरत भगत, सौ. स्नेहल जगताप, सौ. उमा मुंडे यांसमवेत रायगड जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!