पिडीतांच्या मदतीसाठी दिल्या तात्काळ सूचना
संगमनेर संपत भोसले सतत कोसळणाऱ्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोकणगाव, शिवापूर, मेंढवण आणि सावरगाव तळ परिसरात पूर सदृशची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यां मधील ओव्हरफ्लो मुळे ओढ्यांच्या पाण्याने शेती पाण्या खाली गेली असून, दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या संसारांना मोठा धक्का बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे व भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले.
येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळली असल्याची माहिती समजतात आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ कोकणगाव शिवापूर संजय भोसले यांच्या वस्तीवर अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार खताळ यांनी ओढ्याच्या पाण्यातून पायी जात पडलेल्या घराची पाहणी केली याच परिसरातील अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकात बंधाऱ्याचे पाणी घुसले असून, त्यांचे पीक नष्ट झाले आहे. तसेच,बाळू नाना साबळे यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे या पडलेल्या घराचा पंचनामा करून नुकसान ग्रस्तांना कशी लवकरात लवकर मदत मिळून देता येईल याबाबतचे निर्देश दिले.
वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यावरील म्हसोबा ते माळेगाव मार्ग आणि अमृतेश्वर रस्ता पूर्णपणे पाण्या खाली गेला आहे.यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, स्थानिक ग्रामस्थांनी आमदार खताळ यांच्याकडे निवेदन देऊन अमृतेश्वर मंदिराकडे जात असणाऱ्या रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी केली . त्यावर आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत सूचना दिल्या
आमदार अमोल खताळ यांच्यासोबत संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता शाम मिसाळ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद भाजपचे नेते हिरामण वायकर घनश्याम भोसले लक्ष्मण घोडे भारत जोंधळे रामेश्वर जोंधळे बाळासाहेब जोंधळे आदिनाथ पवार महेश जोंधळे यांच्यासह कोकणगाव शिवापूर माळेगाव हवेली वडगाव पान येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
