अनाथाला सहारा देणाऱ्यात मला देव दिसला.
अज्ञानांना ज्ञान देणाऱ्यात मला देव दिसला अपंगांना आधार देणाऱ्यात मला देव दिसला.
भुकेल्यांना अन्नदान देणाऱ्यात मला देव दिसला बेघरांना निवारा देणाऱ्या मला देव दिसला.
आपल्याला अन्न देणाऱ्या अन्नदाता शेतकरी बापात मला देव दिसला.
अन्याच्या प्रतिकार करणाऱ्या प्रत्येक समाजसुधारकात मला देव दिसला.
समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रत्येक समाजसेवकात मला देव दिसला.
असा देव तुम्हाला कधी दिसला का!
ऋतुजा अहिरे-संगमनेर
