दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे येथील नागरिकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बदली झालेल्या शिक्षकांना पालक व विद्यार्थी व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गहिवरलेले अवस्थेत व डोळे पाणावलेल्या स्थितीमध्ये येथून बदली झालेले शिक्षक श्री कानडे सर्व श्रीमती डोके यांना निरोप दिला.
यावेळी येथे बदलून गेलेले शिक्षक श्री कानडे हे या दाड खुर्द गावामध्ये गेली सात वर्षांपासून कार्यरत होते तर श्रीमती डोके या दाढ खुर्द गावामध्ये गेली नऊ वर्षापासून दाढ खुर्द येथे कार्यरत होत्या त्यामुळे या दोन्ही शिक्षकाचे विद्यार्थी पालक ग्रामस्थ व व्यवस्थापन समिती अतिशय ऋणानुबंध होते.
येथील विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे समजून या दोन्ही शिक्षकांनी येथील अनेक विद्यार्थी सात ते नववर्ष कालखंडामध्ये विद्यार्थी घडवण्याचा या शिक्षकांनी खूप प्रयत्न करून अचानक यांची बदली झाल्याने येथील विद्यार्थ्यांनी या शिक्षकांना निरोप देताना अक्षरशःहंबरडा फोडत निरोप दिला.
यावेळी श्री कानडे सर्व श्रीमती डोके यांनी आपल्या मनोगत मध्ये सात ते नऊ वर्ष कालखंडामध्ये येथील गावातील ग्रामस्थांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोलाचे सहकार्य करत येथील शिक्षकांवर व शाळेवर विश्वास ठेवला आणि शाळेची
प्रगती होत असतानाच त्यांची बदली झाल्याने आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एकमेव दाढ खुर्द हे गाव आमच्या हृदयात ठेवून या गावाने आम्हाला खूप प्रेम देत निरोप दिला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच आम्ही आमच्या काळामध्ये येथील विद्यार्थी घडवण्यासाठी व त्याच्या
सर्वांगीण विकासासाठी खूप प्रयत्न करून या पुढील काळामध्ये दाढ खुर्द गावातील विद्यार्थी नक्कीच मोठ्या पदावर दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करत दोनही शिक्षकाच्या डोळ्यांमध्ये पाणी बघावयास मिळाले त्यामुळे नागरिक गहिवरून गेले तर विद्यार्थी सुद्धा हंबरडा फोडत होते.
त्यामुळे आम्ही या गावचे खूप ऋणी असून आम्ही या गावाला कधी विसरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आपला निरोप घेतला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष सुनील बाळासाहेब जोशी यांनी श्री कानडे यांचा व श्रीमती डोके यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला
तर नव्याने बदलून आलेले आदर्श शिक्षक अरुण ब्राह्मणे सर हे व श्रीमती जाधव यांच्या गावचे विद्यमान सरपंच सतीश कुंडलिक जोशी यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी युवक नेते किशोर जोशी मा. सरपंच अशोक जोशी संजय जोशी हरिभाऊ जोरी संदीप नाईकवाडी प्रकाश वसंत जोशी अनिल मारुती पर्वत दगडू साळवे डॉ.राजेंद्र साळवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर यावेळी येथील पालक संदीप जणांनी मुलांना खाऊ वाटप केले तर या शाळेमध्ये सध्या ९० विद्यार्थी असून तीन शिक्षक कार्यरत आहे यामध्ये श्री.ब्राह्मणे श्री.भांगरे श्रीमती जाधव हे असून पालक व्यवस्थापन समितीने यापुढील काळामध्ये विद्यार्थी घडवून गावचं नाव उज्वल करावे अशी अपेक्षा नवीन शिक्षकाकडे करत त्यांच्या भावी कार्याला गावच्या वतीने शुभेच्छा दिल्या
