सुमनबाई गायकवाड यांच्यावर पर्यावरणपूरक अंतिम संस्कार

Cityline Media
0
आश्वी खुर्द ला पहिल्यांदा झाला असा अंत्यसंस्कार

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमन बाबुराव गायकवाड  वय ८० यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन, तिन पुतणे ,नातवंड असा मोठा परिवार आहे.
 सामाजिक कार्यकर्ते आश्वी खुर्द वि.वि. कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुरेश गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत. तसेच राहाता पंचायत समितीतील अधिकारी मकरंद गायकवाड आश्वी  खुर्द सहकारी दुध संस्थेचे मा.उपाध्यक्ष विजय गायकवाड महेश गायकवाड यांच्या चुलती तर मा. सरपंच विनायक गायकवाड दामोधर गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांच्या त्या मावशी होत.

सुमनबाई गायकवाड यांच्यावर  आश्वी खुर्द येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी सामाजिक राजकिय धार्मिक क्षेत्रातील मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.

 सुमनबाई गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार पर्यावरणाचे रक्षण व्हावे तसेच पर्यावरणाचा समतोल राखता यावा तसेच वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेत गायीच्या शेणापासून निर्मित गोवरी  तसेच गायीचे तूप, निसर्गनिर्मित कापूरच्या साहाय्याने पर्यावरणाचे रक्षण होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आश्वी बुद्रुक येथील उज्वल गोरक्षण केंद्र गोशाळेच्या वतीने अंत्यसंस्काराचा एक अनोखा उपक्रम  प्रथमच राबवण्यात आला.

या कार्यासाठी भविष्यात उज्वल गोरक्षण केंद्राचा वतीने अल्पनिधी घेतला जाणार असुन. त्या निधीचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी शेणापासून निर्मित गोवरीचा पुरवठा केला व जाळण्यासाठी मदत व्हावी म्हणून गायीचे शुद्ध तूप व कपूर ही दिले जाणार आहे.

अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी गोरक्षण केंद्राचे कार्यकर्ते थांबून योग्यरीतीने हा विधी पार पाडणार असुन लाकडाचा वापर या ठिकाणी टळत असल्याने निसर्गाचा ही समतोल राखला जाणार आहे. या मिळालेल्या निधीतून गोमातेच्या रक्षणासाठी सहकार्य मिळेल या उद्देशाने पर्यावरणपूरक अंतिम संस्कार करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

मांचीहिल येथील गोशाळेचे कार्य २० वर्षापासून सुरू असून गेल्या या वर्षापासून पर्यावरणपूरक अंतिम संस्कार या शाळेच्या वतीने सुरू करण्यात येत आहे.या मिळालेल्या निधीपासून गायीचा चारा उपलब्ध करण्यात येणार असुन जनतेच्या सहकार्याने आम्ही हे पर्यावरणपूरक अंतिम संस्कार करु असे उज्वल गोरक्षण केद्राच्या कर्मचारी वर्गाने सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!