नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी व पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे दिंडोरी पेठ तालुका ओला दुष्काळ जाहीर करावी, अशी मागणी मा.आमदार धनराज महाले यांनी केली आहे.
गेल्या ६ मे पासून तर आज पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. याआधी पावसामुळे भात, नागली, बरई,उडीद, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, मका, सोयाबीन आदी पिकांची शेतकऱ्यांनी मधल्या काळात भर पावसात मोठ्या कष्टाने पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे सर्व पीक खराब होत चाललेली आहेत. तसेच आतापर्यंत खते, औषधे, मजूर मोठ्या प्रमाणावर खर्च करून सुद्धा
अति पावसामुळे पीक धोक्यात आलेली आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद दिंडेरी व पेठ तालुक्यामध्ये झालेली आहे. आतापर्यंतचा पावसाचा एकत्रित हंगाम दिडोरी ६४७.७ मिलिमीटर एवढा मोठा प्रमाणात पाऊस पडला आहे. अगोदरच शेतीमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे. शेतकन्योता दरवर्षी कोणाश्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी वर्ग शेतीच्य भागभांडवलसाठी ऊसनवारी, कर्ज काढून शेतीपिके उभे करतात. परंतु दरवर्षी आस्मानी संकट के असल्याने शेतकऱ्यांनी ऊस्मवारी घेतलेले पैसे फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
