विद्यार्थ्याचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर
नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील कनाशी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडली होती.काल सकाळपासून अचानक प्रकृती गंभीर झाल्याने शाळेतील अधिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे नेमकी जबाबदारी असताना विद्याव्याला वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला,असा आरोप उपस्थित आणि पालकांनी केला.
सकाळी शाळेतील शिक्षक व विद्याथ्यांच्या डोळ्यांसमोर रोहितचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा व प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अधीक्षक संजय नांदगे यांनी गंभीर निष्काळजीपणा केल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले.यावेळी आदिवासी बांधवानी दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आंदोलनाचा इशारा दिला.
