पहिल्यांदाच वर्ल्ड स्कूल हॉलीबॉल चॅम्पियनशिप साठी भारत सज्ज

Cityline Media
0
भारतीय शालेय क्रीडाक्षेत्रातील सुवर्ण पान

पुणे दिपक कदम १९५४ मध्ये स्थापना झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) च्या सुवर्ण इतिहासात आजचा दिवस न भूतो न भविष्यती असा ठरला आहे. पहिल्यांदाच भारताचा शालेय संघ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप (यु-१५) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. ही स्पर्धा चीनमधील शंगलुओ येथे ४ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार असून, या मोहिमेसाठी २३ मुले व २३ मुलींची संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर झालेल्या निवड चाचण्यांना देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलांच्या गटात २७ राज्यांतील तब्बल १९२ खेळाडूंनी, तर मुलींच्या गटात २३ राज्यांतील १६३ खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. तज्ज्ञ प्रशिक्षक व तांत्रिक अधिकाऱ्यांनी काटेकोर मूल्यांकन करून अंतिम ४६ जणांची निवड केली.

मुलांच्या गटात निवडलेले खेळाडू
कार्तिक सहरावत (उत्तर प्रदेश), आदेश सिंग (विद्या भारती), दक्ष पवनकुमार पटेल (गुजरात), आयुष के. सिंग (झारखंड), निशांत खोखर (हरियाणा), अप्रतीम भदौरिया (उत्तर प्रदेश), नेविल कृष्णा मनोज (केरळ), अमन (हरियाणा), सोहम कुमार (गुजरात), मानव बिजू (केरळ), मोहम्मद शाकीर (उत्तर प्रदेश), अटाडा चरन (आंध्र प्रदेश), नासिर अजाज सोफी (जम्मू काश्मीर), गुरु जीवन (राजस्थान), एडविन पॉल सिबी (केरळ), अब्दुल्ला (छत्तीसगड), आर्यन भारद्वाज (उत्तर प्रदेश), राजत धांगर (राजस्थान), मोहित जाट (राजस्थान), अधिज्योतीश्वर पी. एस. (केरळ), शहाबद गौतम (पंजाब), पी. थरण (पुडुचेरी), वंश चौधरी (दिल्ली).

मुलींच्या गटात निवडलेल्या खेळाडू
खायाती धांता (हिमाचल प्रदेश), शगुन संदीश वर्मा (कर्नाटक), रूपकथा घोष (पश्चिम बंगाल), महीषा (तामिळनाडू), श्रीनिधी उन्नीकृष्णन (केरळ), सिद्धी दशरथ गायकवाड (महाराष्ट्र), इच्छा (हरियाणा), शारण्य घोष (पश्चिम बंगाल), रागाशी महादेवन (तामिळनाडू), रिया (हिमाचल प्रदेश), अभिषिक्ता पॉल (पश्चिम बंगाल), पूजा राजबंशी (पश्चिम बंगाल), अनीता जाट (राजस्थान), सौमिया डी (तामिळनाडू), अन्वी कनावत (राजस्थान), वैश्णवी सथ्यान (केरळ), कार्तिका चलाकोट (के.व्ही.एस.), प्रीती (हिमाचल प्रदेश), अद्रिका दास (पश्चिम बंगाल), राजल बेन प्रतापभाई वाला (गुजरात), साहेली सामंता (पश्चिम बंगाल), आकांक्षा पांडे (उत्तर प्रदेश), रिंकी देवी (छत्तीसगड).

निवडलेल्या खेळाडूंना लवकरच कोचिंग कॅम्पसाठी बोलावले जाणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे (पासपोर्ट, वयाचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र) तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एसजीएफआय पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. दीपक कुमार (आयएएस) यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले, “भारतीय शालेय क्रीडाक्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. पहिल्यांदाच वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिपमध्ये आपला संघ उतरणार आहे. या मुला-मुलींच्या प्रयत्नांमुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उजळेल.”
यावेळी फेडरेशनचे सर्व कार्यकारिणी  सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही निवड भारतीय शालेय क्रीडांगणाला नवी ऊर्जा व नवे व्यासपीठ देणारी आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!