मालेगाव प्रतिनिधी शहरातील वर्धमान शिक्षण संस्था,काकाणी विद्यालय, या.ना.जाधव विद्यालय, काबरा विद्यालय, अभिनव विद्यालय अशा विविध मालेगाव शहर व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना "शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या बॅगचे वितरण समारंभ" शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत मालेगाव शहरातील २० ते २५ शाळांना एकूण ८५०० बॅग्सचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री भुसे यांनी सांगितले की "ही बॅग फक्त शालेय पिशवी नसून शिक्षणात मदत करणारे साधन आहे. अभ्यास करताना बॅगमधील डेस्कचा उपयोग करून शिक्षणाचा आनंद घ्या,मन लावून शिका,मोठे व्हा आणि आपल्या देशाचे, राज्याचे तसेच आपल्या मालेगावचे नाव उज्ज्वल करा." तसेच या उपक्रमाबद्दल ओएनजीसी कंपनीचे विशेष आभार मानले.
ही बॅग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हलकी,टिकाऊ आणि अभिनव पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. शाळेत किंवा घरी अभ्यास करताना बॅगमधील टेबलसदृश डिझाईनचा उपयोग करून मुलांना अभ्यास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
या वितरण सोहळ्याला शिवसेना पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
