नाशिक दिनकर गायकवाड सातपूर परिसरात उघडझाप असलेल्या पावसामुळे नागरिकांचे जगजीवन विस्कळीत झाले आहे.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचे तळे साचल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी तर पाण्यामुळे वाहने बंद पडल्याने नागरिकांना पाण्यातून वाहन ढकलत जावे लागले.
सातपूर परिसरात ड्रेनेजची वेळेवर सफाई होत नसल्याने ड्रेनेज तुंबून गटारीचे घाण पाणी पावसाच्या पाण्यात मिसळले व ते अनेक घरांमध्ये शिरले त्यामुळे नागरिकांनी महानगर पालिकेच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.अशोकनगर, राधाकृष्णनगर, सावरकरनगर बासह अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे तळे साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात हीथ परिस्थिती निर्माण होते. पण मनपाकडून कायमस्वरूपी उपयोजना होत. नाही. मनपा अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून पाणी निचऱ्याची उपयोजना करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे,रवींद्र देवरे,सार्थक नागरे यांनी केली.
