नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा रोडवरील शिव नदीच्या पात्रात रेणुका मातेच्या मंदिराजवळ सध्या बर्फासारखा शुभ्र फेस तयार झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.मागील दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे शिव नदीला मोठा पूर आला होता.आलेल्या फेसामुळे नागरिकांत तर्क वितर्क लावले जात होते.
या पूराच्या पाण्यातील घाण,मानवी कचरा आणि रासायनिक द्रव्ये नदीच्या प्रवाहात मिसळल्यामुळे फेस तयार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण प्रेमींच्या मते,नदीत वाढलेला मानवी कचरा, डिटर्जंट्स, तसेच सांडपाण्यातील रसायने मिसळल्यामुळे हा फेसाचा थर तयार होतो. यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि जलीय जीवसृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने नदीपात्र स्वच्छतेवर भर देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
