शिर्डी प्रतिनिधी राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील कोल्हार,पाथरे, हनुमंतगाव भागात मोठ्या स्वरुपातील पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले असून ओढे-नाल्याचे पाणी शेतात गेल्याने पीकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी,गावातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत पालकमंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला.तसेच तातडीने कराव्या लागणाऱ्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा केली.
