चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत ३५ विनानंबर प्लेट गाड्यांवर राहुरी पोलिसांची कारवाई

Cityline Media
0
राहुरी प्नतिनिधी राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस ठाण्याने नुकतीच विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. 
 मोहिमे दरम्यान ३५ दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली त्या वाहनांवर १८,५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्या गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या.
राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना पोलिस ठाण्याच्या वतीने आव्हान करण्यात आले की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर त्वरित पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल. 

ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त  भवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात पोसई सप्तर्षी स. फो. भाऊसाहेब आव्हाड पो.हे.काँ.फुलमळी होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.

नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल
     तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.असे यावेळी सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!