पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माजी विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांचा संवाद

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून नावलौकिक प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आणि त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी या मेळाव्याद्वारे मिळाली.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा देत संस्थेने दिलेल्या शिक्षण व संस्कारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक वर्षांनंतरही संस्थेशी कायम राहिलेला ऋणानुबंध व माजी विद्यार्थ्यांचा आत्मीय सहभाग ही परंपरेची जपणूक आहे. त्यामुळे आपल्या संस्थेचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असल्याचा अभिमान यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्नल उपदेशकुमार शर्मा, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भारत इंगोले,डॉ. प्रताप बडे, विश्वासकुमार बोरकर व संजय बोडके हे संस्थेतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री डॉ. सुजय विखे. वसंतराव कापरे, संचालक डॉ. अभिजीत दिवटे,डॉ. पी.एन. गायकवाड, डॉ. सुनील कोल्हापुरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!