विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान देणारे कृतिशील शिक्षक दिलीप खरात.

Cityline Media
0
शिक्षकांतील सेवाभावी राजामाणूस दिलीप खरात 

शिक्षक हि निर्मिकाने दिलेली सुंदर भेट आहे ‌असे मानव निर्मित साहित्यात वर्णनीय झाले आहेत कारण शिक्षक हा एका चांगल्या राष्ट्राचा निर्माता असतो तो देशाचे उज्वल भविष्य घडवत असतो, शिक्षक आपल्याला कोणत्याही स्वर्थाशिवाय यशाचा मार्ग दाखवतात चांगले वर्तन आणि नैतिकतेची व्यक्ती होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देतात शिक्षकांशिवाय जीवनात मानसिक सामाजिक आणि बौद्धिक विकास होऊ शकत नाही.सांस्कृतिक जाणिवेसह आपली सामाजिक जाणीव प्रगल्भ असलेले अकोले तालुक्यातील मान्हेरे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांतील सेवाभावी राजामाणूस म्हणजे दिलीप मुरलीधर खरात.
सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावलेल्या मुळा नदीच्या खोऱ्यात असलेले कोतूळ हे सरांचे मुळ गाव विस्थापित परिवारात त्यांचा जन्म झाला घरची परिस्थिती अतिशय बेताची आणि हालकीची अठरा विश्व दारिद्र्य पाट्यावर पुजलेले कोतूळ हे गाव जरी मुळा नदीच्या खोऱ्यात असले तरी सारा परिसर खडकाळ आहे आज कोतुळ गाव बागायतदार बनत आहे पिंपळगाव खांड धरणाच्पा पाण्याचा फायदा येथील सर्व एक वर्गांना होत आहे आदिवासी नेते दिवंगत मधुकर पिचड त्यांच्या  कार्य तत्परतेमुळे हे शक्य झाले आहे त्यामुळे पाणीच पाणी आहे गावाच्या आजूबाजूने येथील पावसाचे पाणी बऱ्याचदा वाहुनच जाते आणि लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्यातुन अनेक कुटुंबे पाण्याअभावी स्थलांतरित झालेले आहेत आणि याच विस्थापित लोकांना नदी लगतचे पाणीदार गावे आणि इतर गावाचे बागायतदार लोक डोंगरी आदिवासी डांगवाणी आणि घाटावरचे म्हणून खिजवतात टिंगल टवाळी करतात असे अनुभव अनेक डोंगरी माणसाला येतात तरीही तो माणूस आजही अनेक निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित संकटांचा धीराने आणि नेटाने सामना करत ठाम उभा आहे.

 शासनाने जरी आम्हाला डोंगरी म्हणून प्रमाणित केले आणि इतरांच्या नजरेत घाटावरचे म्हणत खिजवणे आले पण ह्याच कातळाच्या भक्कम साथीने तुमची गर्वान्नत इमारत उभी राहते आणि तुमच्या आमच्या जगण्याला नवा अर्थ देते असा आशावाद आणि प्रेमाचा आपुलकीचा आणि एकात्मतेचा संदेश हाच डोंगरी माणूस देतो हे विसरता कामा नये.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचित आणि दुर्लक्षित लोकांना संदेश दिला होता की शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा आणि ह्याच बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन खरात सरांनी शिक्षणासाठी आपली त्रेधातिरपीट करून घेतली.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठें सारखा ठाम आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती मानसिकतेच्या जोरदार आज खरात सर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करुन देशाचे उज्वल भविष्य घडवत आहे त्यांचा प्रत्येक विद्यार्थी विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगताना दिसतोय.आपले कर्तव्य पार पाडताना त्यांची सेवाभावी वृत्ती अनेक तरुणांमध्ये आत्मविश्वास संचार करते.

अनेकांच्या सुख दुःख प्रसंगी खरात‌ सर नेहमी धाऊन येतात अकोले येथे आपली पत्नी आणि मुले प्रणव अथर्व समवेत स्थित असलेले खरात सर नेहमी इतरांच्या मदतीला धावून जातात तसेच अनेक सेवाभावी संस्थांना त्यांनी हातभार लावून आपल्यातील माणूसपण जपले आहेत.

कितीही अशैक्षणिक कामाचा व्याप असला तरी ते अनेक संकटांवर मार्ग काढतात आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक नीतीमुल्यांची जपवणूक केली आहे अतिशय संवेदनशील मनाचे खरात सर जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तालुका जिल्हा आणि राज्यातील अनेक दुर्ग सर करणारे चांगले गिर्यारोहक बनले आहे.

आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले आणि पर्यटन स्थळांना भेटी देऊन   निसर्गोत्सवाचा आनंद त्यांनी घेतला आहे एकदा आम्ही या पर्यटनाबाबत सरांना विचारले असता ते मिष्कीलपणे म्हणाले की पर्यटनाने जाणिवा प्रगल्भ होत असतात तेव्हा आम्ही सरांना आपले प्रवास वर्णने लिहिण्याची साद घातली.

माणसाच्या या गर्दीत आणि धकाधकीच्या जीवनात अनेक चेहरे भेटतात काही चांगले,काही वाईट काही लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे जी अनेक मानस जगताना जे लाभले त्यातले एक तुम्ही माणूस म्हणून ठाम आहात सर.आज सरांचा वाढदिवस त्यानिमित्ताने..

तुम्हाला प्रत्येक पावलावर यश मिळो
तुमच्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुम्हाला कशाची कमतरता ना भासो
आणि तुमचं स्वास्थ असंच छान राहो
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुलं तुमच्या आयुष्यात ‌गंध भरावी 
निर्मिक तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धी देवो
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा सर
Wish You Happy Birthday   
Diliprav..!

manavmudrasvs2021@gmail.com
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!