महंत भास्कर गिरी महाराजांकडून आश्वी खुर्दच्या संयुक्त मंदिर जिर्णोद्धाराच्या कामांचे कौतुक

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे प्रभु श्रीराम,श्रीदत्त व शिवभक्त बालब्रम्हचारी प.पू. पुंजाआई माता यांचे संयुक्त मंदिराचे जिर्णोद्धार सुरू असून नुकतेच दुसऱ्या टप्प्यातील काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या संदर्भात मंदिर जिर्णोद्धाराचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आश्वी खुर्द पुंजाआई भक्त मंडळाने विशेष छायाचित्र पुस्तकाचा संग्रह करून तो देवगड देवस्थानचे प्रमुख मंहत ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांना भेटून सादर केले.
या वेळी मंहत महाराजांनी मंदिरातील सुरु असलेल्या कामाची सविस्तर माहिती जाणून घेतली व भाविकांशी दिर्घकाळ चर्चाही केली.मंदिर कळसाचे काम सुरु झाल्यावर स्वतःभेट देण्याचे आश्वासन देत त्यांनी सुरू असलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले.भविष्यात हे मंदिर अत्यंत सुंदर व भक्तिमय असे उभे राहील, अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांनी सुमारे २० लाख रुपयांचा निधी दिला असून ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर वर्गणी देऊन सहकार्य केले आहे. या मंदिरात प्रभु श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान  दरबार तसेच श्री प्रभुदत्त आणि आश्वी परिसराचे ग्रामदैवत शिवभक्त बालब्रह्मचारी प.पू. पुंजाआई माता यांचे एकत्रित मंदिर साकारत आहे.

पुंजाआई मातांनी आपल्या आयुष्यात धार्मिकतेचा प्रसार करत उदीरूपी आशीर्वादाने असंख्यांना साक्षात्कार दिला. त्यांचे जन्मगाव पुनतगाव (ता. नेवासा) तसेच बकुपिंपळगाव व प्रवरासंगम येथेही भव्य मंदिरे उभारलेली आहेत. देवगड देवस्थानचे संस्थापक मंहत किसन गिरी महाराज यांच्या त्या गुरुभगिनी होत, तर मंहत भास्कर गिरी महाराज पुंजाआईंना आई मानतात.

भक्तांच्या श्रद्धा, ग्रामस्थांचे सहकार्य आणि संतांचा आशीर्वाद यामुळे हे मंदिर लवकरच आश्वी परिसरातील एक अद्वितीय धार्मिक केंद्र म्हणून उभे राहणार आहे.
- महंत स्वामी प्रकाशनंद गिरी यांच्या काल्याचे किर्तनाचे आश्वीत आयोजन 
शिवभक्त प.पु पुंजाआई यांची   जानेवारी २०२६ ला ३० वी पुण्यतिथी साजरी होत असुन त्या त्रिदिनी सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनास देवगड देवस्थान चे मंहत स्वामी प्रकाशनंद गिरी महाराज यांनी वेळ दिली आहे व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा काला पार पडणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!