मुंबई कृष्णा निकम जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाले असून ठाण्याला महिला तर पुणे सर्वसाधारण; महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर अहिल्यानगरची धुरा आता अनुसूचित जमातीच्या महिलेकडे येणार असल्याने सर्वच पक्षांनी आता उमेदवार उभा करण्याच्या तयारीला सहमती दर्शवली आहे.एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदाच्या निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती. दोन ते अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेलल्या होत्या. आरक्षणाामुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या संपूर्ण प्रक्रियेला वेग आला होता. ग्रामविकास विभागाने आरक्षणाबाबत जाहीर केले.आरक्षण काढताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले.राज्यातील ३४ जिल्ह्यांची जंत्री पुढीलप्रमाणे.शंशं
१-ठाणे- सर्वसाधारण महिला
२-पालघर - अनिसूचत जमाती
३-रायगड- सर्वसाधारण
४-रत्नागिरी- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
५-सिंधुदुर्ग- सर्वसाधारण
६-नाशिक- सर्वसाधारण
७-धुळे - नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
८-नंदुरबार- अनुसूचित जमाती
९-जळगाव- सर्वसाधारण
१०-सातारा - नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
११-अहिल्यानगर- अनुसुचित जमाती (महिला)
१२-पुणे- सर्वसाधारण
१३-सांगली - सर्वसाधारण महिला
१४-कोल्हापूर- सर्वसाधारण महिला
१५-छ. संभाजीनगर - सर्वसाधारण
१६-जालना- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१७-बीड- अनुसूचित महिला
१८-परभणी- अनुसूचित जाती
१९-नांदेड - सर्वसाधारण मागास प्रवर्ग
२०-धाराशिव- सर्वसाधारण (महिला)
२१-लातूर- सर्वसाधारण (महिला)
२२-अमरावती- सर्वसाधारण (महिला)
२३-अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
२४-वाशिम -अनुसूचित जमाती (महिला)
२५-बुलढाणा -सर्वसाधारण
२६-यवतमाळ -सर्वसाधारण
२७-नागपूर -नागरिकांचा मागास प्रवर्ग
२८-वर्धा- अनुसूचित जाती
२९-भंडारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
३०-गोंदिया -सर्वसाधारण (महिला)
३१-चंद्रपूर- अनुसचित जाती (महिला)
३२-गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)
३३-हिंगोली- नागरिकांचा मागास प्रवर्ग
३४-सोलापूर- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
