एक कोटी वीस लाख किंमतीच्या ‌अभ्यासिकेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते लोकार्पण

Cityline Media
0
वैजापूर शहरात शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात 

वैजापूर प्रतिनिधी वैजापूरच्या शैक्षणिक इतिहासात आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक ठरला आहे शहरातील निवारा नगरी परिसर येथे नगरविकास विभागांतर्गत मंजूर करून आणलेल्या एक कोटी वीस लाख निधीतील बांधण्यात आलेल्या "अभ्यासिका" चे लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री मा.नामदार एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागांतर्गत शहरातील निवारा नगरी परिसरात "अभ्यासिका" बांधकामांसाठी विशेष प्रयत्न करून "१ कोटी २० लाख रुपये" निधी मंजूर करून आणला. संपूर्ण झालेले हे काम आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीपस्वामी व आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते लोकार्पित झाले.
प्रसंगी या कार्यक्रमास मा. आमदार_भाऊसाहेब चिकटगावकर व उपनगराध्यक्ष साबेर यांची कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी उपस्थिती होती.
.
ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेली ही अभ्यासिका म्हणजे शैक्षणिक प्रगतीचा नवा टप्पा ठरणार आहे.शहरातील व ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण,आधुनिक ग्रंथालय सुविधा येथे उपलब्ध होणार असून,विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. 
.
कार्यक्रमा दरम्यान जिल्हाधिकारी  यांनी अभ्यासिकेमुळे निर्माण होणाऱ्या शैक्षणिक संधींबद्दल समाधान व्यक्त केले आणि हा उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

सोहळ्यास उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी भागवत बिघोत, गटविकास अधिकारी डॉ.श्रीकृष्ण वेणीकर,तालुका कृषी अधिकारी ठक्के, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने,उपकार्यकारी अभियंता.अजित रोडगे, गटशिक्षणाधिकारी.हेमंत उशीर व सेवानिवृत्त अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या सोहळ्याला शहरातील सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,भगिनींनी व विशेषत: युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!