तुझा गेम करते म्हणत समलैंगिक विवाह लावला;लग्नातील दागिन्यांचा अपहार

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड समलैंगिक विवाह लावून देत लग्नात मिळालेल्या दागिन्यांचा अपहार करून एका कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या दाम्पंत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सिद्धेश रवींद्र बाविस्कर (रा. पाम रेसिडेन्सी, नाशिकरोड) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले,की आरोपी अश्विनी चंद्रकांत सोनार (वय २७) हिचा गौरवी प्रमोद गदरे (रा. डी. जगन्नाथ बम, मुंब्रा देवी कॉलनी रोड, दिवा, जि. ठाणे) हिच्यासोबत समलैंगिक विवाह दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे झाल्याचे माहीत असताना देखील त्याबाबत फिर्यादी बाविस्कर यांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही.
                 छाया रेखांकन-प्रकाश कदम 
अश्विनीचे वडील चंद्रकांत पितांबर सोनार (वय ५४) व आई कल्पना चंद्रकांत सोनार (वय ५०, रा.

शहापूर रोड, मु. कांबारे, ता. वाडा, जि. पालघर) यांनी जबरदस्तीने तिचे लग्न फिर्यादीसोबत लावून देत फिर्यादीसह त्याच्या कुटुंबीयांची फसवणूक केली, तसेच फिर्यादीने लग्नात अश्विनीला दिलेले सोन्याचे दागिने परस्पर स्वतःकडे ठेवून घेत त्याचा अपहार केला, तसेच ही बाब फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर आरोपी अश्विनी हिने अश्लील शिवीगाळ करीत

"तुझा गेम करते," अशी धमकी दिली. हा प्रकार दि.२ मे ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नाशिकरोड येथे घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अश्विनी सोनारसह तिचे आईवडील चंद्रकांत

सोनार व कल्पना सोनार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!