गणपती विसर्जन सोहळा पारंपरिक भक्तीरंगात रंगला

Cityline Media
0
"बाप्पा तुझी कृपा" या नव्या गीताने भक्तांची मने जिंकली

शिर्डी प्नतिनिधी यंदाच्या गणपती विसर्जनाला एक आगळावेगळा भक्तिरंग लाभला.नेहमीच्या डि.जेच्या गोंगाटा ऐवजी पारंपरिक भजनाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.  टाळ-मृदंग आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. विसर्जनाचा हा सोहळा भक्ती, शांती आणि संस्कृतीच्या वारशाची जपणूक करणारा ठरला.
याच पार्श्वभूमीवर सादर झालेले नवे गीत "बाप्पा तुझी कृपा" विशेष आकर्षण ठरले. हे गाणे एनपी व्हिजन  फिल्म या चॅनेलखाली प्रकाशित झाले असून,दिग्दर्शन प्रमोद पंडित यांनी केले आहे.गाण्याचे निर्माता आबा निर्मळ असून, त्यांनी या गाण्याद्वारे परंपरा आणि भक्तीचा संगम साकारण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या केला आहे.

या गाण्यात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने भक्तिरस अधिक खुलवला.गाण्यात सहकलाकार
राजाराम आहेर महाराज,नीलम शिंदे,वनिता निर्मळ,सुहास निर्मळ,राणी निर्मळ,सविता निर्मळ,भाऊसाहेब मोगल, ज्ञानदेव शिंदे,डॉ.अण्णासाहेब म्हाळसकर, देविका निर्मळ, तनश्री निर्मळ तसेच बालकलाकार धनश्री निर्मळ, स्वरा निर्मळ,वेदिका निर्मळ आणि चि.आदेश निर्मळ यांचा सहभाग आहे 

गाण्याच्या शूटिंग दरम्यान प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून भक्तीभाव जिवंत केला. परिणामी "बाप्पा तुझी कृपा" हे गीत विसर्जन सोहळ्याचे आध्यात्मिक वैशिष्ट्य ठरले.या उपक्रमामुळे विसर्जन सोहळा केवळ उत्सव न राहता भक्ती, शिस्त आणि परंपरेची जपणूक करणारा प्रेरणादायी सोहळा ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!