नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात सतत पावसाची रिपरिप सुरु असल्याने टोमॅटो पिके करपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे शेतीपिकांवर विविध रोगांबा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
वणी,अंबानेर, सागपाडा,अहिवंतवाडी, जिरवाडे,कोल्हेर, पिंप्री अंचला, चौसाळे, करंजखेड, पिंगळवाडी, खोरीपाडा, कोशिंबे, टाक्याचापाडा, दहीवी, पुणेगाव, पांडाणे, माळेदुमाला, हस्तेद्भाला आदी भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नगदी पीक असलेल्या टोमॅटो पिकाची विक्रमी लागवडी केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उडीद, भुईमूग, सोयाबिन, मका या पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत. परंतु सततच्या रिमझीम पावसाने औषधांची फवारणी करणे अवघड झाल्याने पिकांवर पिवळेपणा आणि
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. जमिनीची तहान पूर्ण होऊन जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण शंभर टक्के थांबल्याने जमिनीतुन पाणी वाहु लागले आहे. पिकासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश जवळपास पिकांना न मिळाल्याने सोयाबीन भुईमुग मका अशा पिकांची जमिनीतील अन्न घटक उबलण्याची प्रक्रीया थांबुन पिवळे पडु लागले आहेत. टोमॅटो पीक सुद्धा फुलकळी लागुन फळ सेटिंगच्या अवस्थेत आहेत. परंतु
सततचा पाऊस यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढुन करपा टोमॅटो पिकाला रोगाला बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जमिनीतुन सतत बाहत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि औषधे फवारणी करणे मोठे डोकेदुखीचे ठरत आहे. काही प्रकारे फवारणी जरी केली तरी लगेचब पावसाने धुवुन जात असल्याने त्याचा पिकाला कोणताच फायदा होत नाही. पिकांनाखत खाद्य देणे गरजेचे असते ते देखील वाहणाऱ्या
पाण्यामुळे बाहुन जात आहे. पिकातुन सतत वाहणान्या पाण्यामुळे पिकांच्या मुळांची जमिनीतील अन्न घटक शोषुन घेण्याची क्षमता थांबुन जात असल्याने त्याचाही पिकावर काहीसा परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सतत पडणारा पाऊस आणि नेहमीच हवामान बदलाचा पिकावर परिणाम होत असल्याने पिकांची खर्चानुसार अपेक्षित जोमदार बाढ आणि फुटखा जर झाला नाही तर त्याचा
उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक उत्पन्नात मोठी घट येऊन मोठा आर्थिक फटका बसण्याची भिती असल्याचे शेतकरी बोलत आहेत. ज्या पिकाच्या उत्पन्नातुन तोडाबर आलेल्या द्राक्षबागांच्या छाटण्या करून त्यासाठी पुढे लागणाऱ्या मजुरी खते व औषधे घेत असतात. त्यालाच जर भांडवल उभे राहीले नाही तर त्याचा लाखो रुपये भांडवली खर्च कसा करायचा याची चिंता आता शेतकरी करू लागला आहे. जवळ असलेले भांडवल नेहमीच चालु पिकासाठी खर्च करून त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी पुढील पिकासाठी भांडवल उभे करून पीक घेत असतात. बाताबरणामुळे तिन्ही ऋतुमध्ये मोठे बदल होवुन पिकांसाठी उपयुक्त असलेल्या पाऊस पाण्यात अनियमितता आणि अवेळी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे आर्थिक चक्र बिघडुन भांडवली गणित कोलमडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
