रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात

Cityline Media
0
नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील हंडीनिमगाव येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल,मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो.
प्रसंगी मंचावरील शाळेचे संचालक अजित अंबाडे यांच्या हस्ते हिंदी साहित्यिक व्यौहार राजेंद्र सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.कोमल घोरपडे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक करुन संचालकांचा सत्कार केला.यावेळी सिमा मरगळ यांनी हिंदी कविताचे सुंदररित्या वाचन केले.

संस्कृती शिंदे,आस्मि शिंदे,राजनंदिनी दवणे व धनश्री डांगे या विद्यार्थिनींनी हिंदी दिवसाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रेरणादायी भाषण केले.या सर्वांनी मातृभाषेच्या जपणुकीचा संदेश दिला. हिंदी दिवसाच्या निमित्ताने सर्वांसाठी हिंदी निबंध स्पर्धा आयोजित केली होती.

उत्साही वातावरणात यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्राचार्य श्री.येवले व उपप्राचार्य पिटर बारगळ यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले. हिंदी विभागाचे शिक्षक रविंद्र सोनकांबळे, सौ.कोमल घोरपडे , सौ.सिमा मरगळ व सौ.कोमल गंगुले यांनी फार परिश्रम घेतले.

सुधीर बनसोडे यांनी कार्यक्रमाची ‌रचना करुन आर्कषक फळा सजावट केली तर श्रेयस आहेर यांनी छायाचित्रण केले.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सोनकांबळे  यांनी केले तर आभार सिमा मरगळ यांनी मानले.


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!