ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून नाफेडचा कांदा रेल्वेने कोलकात्याला पाठवणार

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड केंद्र सरकारच्या वतीने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा आता थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा,या उद्देशाने हा कांदा केवळ २४ रुपये किलो दराने विक्रीसाठी आणण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर लासलगाव येथून ८४० मेट्रिक टन कांद्याचे २१ डब्यांचे रेल्वे रेक कोलकात्याकडे रवाना झाला. या कांद्याचा पुरवठा कोलकाता येथील बाजारात विक्री केला जाणार असल्याने या निर्णयाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर अचानक २०० रुपयांनी घसरून सरासरी १००० ते १२०० रुपये किंटलवर आले आहेत. येवला बाजार समितीत दर केवळ ८५१ रुपये क्विंटलपर्यंत कोसळल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांकडे होणारी व्यथा मांडून मुंबई, दिल्ली येथील मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

शेतकऱ्यांना १० ते १५ रुपये प्रति किलो तोटयाने कांदा विक्री करावा लागत आहे. त्यातच सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात आणल्याने स्थानिक दर आणखी कोसळले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्राहकांना दिलासा मिळत असला, तरी शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कांदा दरातील ही घसरण पुन्हा एकदा शेतकरीह्रसरकार संघर्ष पेटवण्याची चिन्हे येणाऱ्या दिवसात पाहायला मिळणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाअध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!