महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून मानूर महाविद्यालयास उत्कृष्ट श्रेणी प्राप्त

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील मानूर येथील श्री गुरुदत्त शिक्षण संस्था संबलित कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी) महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांच्याकडून उत्कृष्ट महाविद्यालय श्रेणी प्राप्त झाली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ संलग्नित असलेल्या महाविद्यालयांचे दरवर्षी शैक्षणिक अवेक्षण करण्यात येते.यात प्रामुख्याने महाविद्यालयाची इमारत, वर्ग खोल्या,प्रयोगशाळा,संगणक कक्ष, ग्रंथालय या बाबींबरोचर शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे शिक्षकवृंद,कर्मचारी यांची पडताळणी या अवेक्षणात करण्यात येते.

यासोबतब महाविद्यालयाचा दैनंदिन कार्याचा आलेख लक्षात घेत महाविद्यालयात शैक्षणिक कामगिरीसोबत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे इंग्रजी विषय व मूलभूत अधिकार यासारख्या विषयांचे अतिरिक्त ज्ञान दिले जाते. महाविद्यालयाच्या दैनंदिन वाटचालीत संस्था, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा सहभाग आवश्यक असतो.त्यासाठी आवश्यक विद्यार्थी शिक्षक पालक सभा, औद्योगिक भेट,शैक्षणिक सहल,

पेपर-पोस्टर सादरीकरण, प्रश्नमंजुषा स्पर्धा,स्वच्छ व हरित महाविद्यालयीन परिसर यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर संस्थेने विशेष लक्ष दिले आहे. शैक्षणिक अवेक्षणासाठी ठरवून दिलेले निकष पार पडताना एकूण निकषांपैकी ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करण्याऱ्या महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालयाचा दर्जा मंडळामार्फत दिला जातो.

मानूर फार्मसी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१४ पासून सातत्यपूर्ण उत्कृष्ट श्रेणी दर्जा मिळाला आहे. महाविद्यालयाने उत्कृष्ट महाविद्यालय दर्जा सलग अकरा वर्षांपासून टिकवून ठेवला असून शैक्षणिक गुणवत्ता जोपासताना संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांकडेसुद्धा लक्ष दिल्याने संस्थेची ती नावीन्यपूर्ण कामगिरी ओळखली जाते,असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोठावदे यांनी सांगितले, महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ.जे.डी.पवार,अध्यक्ष शैलेश पवार, उपाध्यक्ष गजानन सोनजे, सचिव अनुप पवार, कार्यकारी संचालक प्राचार्य बी.एन.शिंदे,बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ अविश मारू,बी. एडच्या प्राचार्य डॉ.बी. बी. सोनवणे आदींनी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!