म्हैसगाव कमलेश विधाटे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या राहुरीच्या तालुक्यातील म्हैसगांव पंचक्रोशीतील चिखलठाण ,कोळेवाडी ,लेंभेवाडी ,ताहाराबाद ,दरडगांव थडी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, कांदे ,बाजरी ,मका,घास यांसारख्या प्रमुख पिकांचे हजारो हेक्टरवर नुकसान झाले असून अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अक्षरशःकोलमडून पडली आहे.
या भागातील सर्व पिकाचे नुकसानाचे पंचनामा करण्यात सुरुवात झाली आहे यामुळे या शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक मदत होईल या अपेक्षणी सर्वच शेतकरी पंचनामा फॉर्म ,फोटो काढत आहे पंचनामा करण्यासाठी गेल्यानंतर झालेली पिकाची नुकसान पाहून अश्रू अनावर होत आहे शेती पिकाचे त्यामध्ये कपाशी,कांदे,बाजरी ,त्यामध्ये घास मका गिनी गावात जनावराची जीवन आवश्यक वस्तूचा ही मोठे प्रमाणा नुकसान झाले आहे या सर्व पिकांचे पंचनामे करताना म्हैसगांवचे तलाठी भाऊसाहेब पंडित ,मंगेश बेंद्रे कृषी सहाय्यक ,मा. उपसरपंच डॉ शशिकांत गागरे भीमाशंकर दुधात ,बापूसाहेब हरिभाऊ गागरे ,पांडुरंग भागवत गागरे ,निलेश बाळासाहेब आगे, स्वप्निल ज्ञानदेव मुसळे ,ज्ञानदेव सयाजी माने दादासाहेब भागवत गागरे ,राजेंद्र डोके भानुदास भाऊसाहेब यादव ,अनेक लाभार्थी उपस्थित होते .
