आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर संपत भोसले संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलामुलीना शासकीय वस्तीगृह नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या म्हणून संगमनेरला नवीन शासकीय वसतिगृह सुरू करावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला नुकतेच यश आले असून राज्य शासनाने संगमनेरला नवीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणासाठी संगमनेरला येत असतात;मात्र त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते.किंवा त्यांना शहरा बाहेर महागड्या खाजगी वसतिगृहांचा पर्याय स्विकारावा लागतो.
वस्तीगृह नसल्यामुळे अनेक गरीब व मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.जर नवीन शासकीय वसतिगृह सुरू झाले तर त्यांची निवास भोजन व अभ्यास करण्याची सोय होऊ शकते आणि व त्यांची शैक्षणिक प्रगती वेगाने होऊन त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण होईल तसेच सामाजिक व शैक्षणिक संधी मिळेल आणि या वस्तीगृहाच्या माध्यमातून तालुक्यातील मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
यासाठी हे वस्तीगृह सुरू होणे गरजेचे आहे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली होती त्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन वस्तीगृह सुरू करण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वस्तीगृहाचा निश्चितच फायदा होणार आहे.
-संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक परिवर्तनाला गती मिळणार
संगमनेर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन शासकीय वसतिगृहासाठी मंजुरी देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बळकटी मिळाली आहे.यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार . सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे यांचे मनः पूर्वक आभार मानतो.विद्यार्थ्यांना मिळालेल्या या सुविधेमुळे संगमनेर तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाला नवी गती मिळणार आहे.
अमोल खताळ
आमदार संगमनेर विधानसभा
