बहुजन समाज पार्टीचे धर्मेंद्र जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नाशिक दिनकर गायकवाड राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये भरपाई मिळण्याबाबत असे निवेदन बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव ओझरचे मा.उपसरपंच धर्मेंद्र मधुकर जाधव यांच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा.तुषार अशोक राव शेरेकर सहाय्यक महसूल अधिकारी,मुख्यमंत्री सचिवालय नाशिक यांच्यामार्फत नुकतेच देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे तोंडाशी पिके आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.मका,टोमॅटो,कांदा, सोयाबीन,कापूस, केळी तसेच फळबाग यांची नुकसान होऊन शेतकरी हवालदाल झालेला आहे.औषधे,खते,बियाणे मजुरी यामुळे त्रस्त झालेला आहे.
दुबार पेरणी करूनही हाताशी काही हाती उत्पन्न नाही तर पैसा नाही, कोणी कडे जावे सावकाराचे कर्ज डोक्यावर आहे,बँका दरवाजावर उभे आहेत शेतकऱ्यांना सांभाळणार कोण पोशिंदाच जिवंत राहणार नाही त्याचीच अशी मरमर होणार असेल तर त्यास वाचवणार कोण?असा प्रश्न उपस्थित करून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी केली राज्यात की ओला दुष्काळ जाहीर करून एकरी एक लाख रुपये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अन्यथा बसपाच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
