अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा घटकामध्ये पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेश विभागात दिलेले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलिस निरिक्षक किरणकुमार कबाडी,स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी शेवगांव उपविभाग हद्दीतील अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती
काढुन कारवाई करणेबाबत पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोहेकॉ अतुल लोटके,पोहेकॉ संतोष खैरे,पोना बाळासाहेब नागरगोजे, पोना सोमनाथ झांबरे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ यांना रवाना केले.सदर पथक हे पाथर्डी पो.ठाणे हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असतांना,पथकांस गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली.
की, इसम नामे १) सतिष सुरेश डोळस रा. मावळ, पुणे, २) राकेश सुदाम वाळुंज रा.मावळ, ता. पुणे, ३) आकाश देविदास जंगम रा. कामशेत, पुणे, ४) सतिष कृष्णकुमार बिडलांग रा. कारला, मावळ, पुणे हे त्यांचेकडील काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. १२ जे. झेड १८५४ ही मधुन इसम नामे ५) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव याचेकडुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन विक्री करिता शेवगांव येथुन पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यावेळी सदर माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कळविली असता त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.त्यानुसार पथकाने तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे येथे येवुन पोलिस निरीक्षक श्री पुजारी यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला.
असता, त्यांनुसार पोलिस उपनिरिक्षक महादेव गुट्टे,पोकॉ/२७७ इजाज महेबुब सय्यद, पोहेकॉ/१३०९ अल्ताफ अहमद शेख,नेम.पाथर्डी पोलीस ठाणे अशांनासह कारवाई करण्याकरीता आवश्यकत्या साहित्यासह पोलीस ठाणे मधुन सरकारी व खाजगी
वाहनाने निघुन पाथर्डी ते शेवगांव जाणारे रोडवरील माळी बाभुळगांव फाटा या ठिकाणी सापळा रचुन कारवाई बातमीतील नमुद काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. १२ जे झेड १८५४ ताब्यात घेतली,नमुद स्कॉर्पिओ मध्ये ०४ इसम यांना पोलीस स्टाफ,पंचाची
ओळख समजावुन सांगुन त्यांना त्यांचे नांव,गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) सतिष सुरेश डोळस वय २७ वर्षे, रा. कान्हेफाटा, इकोव्हॅली सोसायटी, सी ५०५, मावळ,ता. मावळ, जि. पुणे, २) राकेश सुदाम वाळुंज वय - ३५ वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे,
३) आकाश देविदास जंगम वय - २९ वर्षे, रा. कामशेत,ता. मावळ,जि. पुणे, ४) सतिष कृष्णकुमार बिडलांग वय - ३३ वर्षे, रा. कारला, ता. मावळ.जि. पुणे असे असल्याचे सांगितले. इसमांचे ताब्यातील स्कॉर्पीओ गाडीची झडती घेता सदर गाडीचे पाठीमागील डिकीमध्ये निळे रंगाची ट्रॅव्हल बॅग मिळुन आली.
सदर बॅग उघडुन पाहाता आतमध्ये दोन मोठ्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे काड्या संलग्न असलेले कॅनबिस वनस्पतीचे शेंडे (अंमली पदार्थ गांजा) मिळुन आला. विचारणा केली असता, इसम नामे सतिष सुरेश डोळस यांने तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगुन तो नशेसाठी वापरला जातो.
व सदरचा गांजा हा इसम नामे ५) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव, जि. अहिल्यानगर यांचेकडून खरेदी करुन, वरिल आरोपी १) ते ४) यांनी विक्री करीता आणलेला असल्याचे सांगितले. नमुद आरोपी ताब्यात घेवुन, आरोपींकडून एकूण १३,७०,५०० रुपये किमंतीचा अंमली पदार्थ गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपी नामे १) सतिष सुरेश डोळस वय २७ वर्षे, रा. कान्हेफाटा, इकोव्हॅली सोसायटी, सी ५०५, मावळ, ता. मावळ, जि. पुणे, २) राकेश सुदाम वाळुंज वय - ३५ वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, ३) आकाश देविदास जंगम वय - २९ वर्षे, रा. कामशेत,ता.मावळ, जि. पुणे,
४) सतिष कृष्णकुमार बिडलांग वय - ३३ वर्षे, रा. कारला, ता. मावळ. जि. पुणे, ५) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव, जि.अहिल्यानगर (फरार) यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी
पो.ठाणे, अहिल्यानगर येथे गु.र.नं. ११०३/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क),२०(ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी क्र. १ ते ४ आणि गुन्हयात एकूण १३,७०,५००- रुपये किंमतीचा मुद्देमाल पाथर्डी पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई .सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर निरज राजगुरु,उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव उपविभाग, जि.अहिल्यानगर, किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि विलास पुजारी, पोलीस निरीक्षक, पाथर्डी पो.ठाणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पाथर्डी पो.ठाणेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
