नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील चाटोरी येथील सुनील सुभाष खेलूकर (वय ३७) या तरुणाचा मृतदेह सहाव्या दिवशी गोदावरी नदीत सापडला.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सायखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मृत सुनील खेलूकर यांच्यावर चाटोरी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे
चाटोरी येथील सुनील खेलूकर याने सायखेडा येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली होती.सायखेडा पोलीस ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.सलग दोन दिवस पाणबुडीच्या सहाय्याने शोध घेण्यात आला. अखेर सहाव्या दिवशी त्याचा मृतदेह स्थानिक गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांना चांदोरी शिवारात तरंगताना दिसला. चांदोरीचे सरपंच विनायक खरात यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांना दूरध्वनीवरून कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला व विच्छेदनासाठी निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.सुनील याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
