जालना सिटीलाईन न्यूज नेटवर्क ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची धक्कादायक घटना जालना शहरातल्या नीलम नगर भागात घडली.
रात्री साडे दहा ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अज्ञात व्यक्तीने स्कॉर्पिओ गाडीच्या चारही बाजूंनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. गाडीवरील कव्हर काही क्षणातच जळून खाक झाले. नवनाथ वाघमारे यांनी जालना शहरातल्या कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती. त्याच ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये कॅन घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकला आणि त्यानंतर ही आग लावून दिली. या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
