दुचाकीवरून घराकडे निघालेल्या आजी आजोबांचा नातवासह कार धडकेत करुण अंत

Cityline Media
0
सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क तासगावमध्ये कार आणि दुचाकीचा भयानक अपघात झाला असून,त्यामध्ये आजी-आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामध्ये आणखी चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत तीन जण हे बुर्लीचे येथील असल्याचे समजते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आजी-आजोबा आणि नातू हे तिघे जण दुचाकीवरून घराकडे परत येत होते. त्यावेळी तासगाव-भिलवडी मार्गावर समोरून आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. 

ही धडक इतकी भयानक होती, की दुपाकीचा चुराडा झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील चार जणही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्थानिकांनी तत्काळ जखमींना जवळच्या सम्णालयात दाखल केले.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी

बापू सुतार (वय ५७), आशा शिवाजी सुतार (वय ५५) आणि वैष्णव ईश्वर सुतार (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण पलूस तालुक्यातील बुर्ली येथील रहिवासी होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!