नाशिक दिनकर गायकवाड लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन मुलीला मदतीचा हात देत तिच्या कुटुंबाशी व पोलिसांशी संपर्क साधून सुरक्षित परत पाठवले.
रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील आणि महिला पोलीस शिपाई अरुणा सानप यांना जुने बुकिंग ऑफिस जवळ एकटी रडणारी मुलगी आढळून आली. विचारपूस केली असता ती अल्पवयीन असल्याचे तिने सांगितले.ती नाशिक मधील अंबड परिसरातील शिवशक्ती चौक येथे राहते आणि घरातून रागाने निघून आल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर लोहमार्ग पोलीस यांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधून अंबड पोलिसांना कळवले.अंबड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक नितीन फुलगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी मुलीला स्विकारून तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.या घटनेत लोहमार्ग पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळून एका असहाय मुलीला मदतीचा हात दिला.रेल्वे पोलिसांचे समर्पण आणि तत्परतेमुळे मुलगी सुरक्षित परतली,याबाबत नागरिकांनी कौतुक केले.
