दहशतीला बळी न पडता विकास ‌कामांच्या मागे उभे राहण्याचे धाडस दाखवा-आमदार खताळ

Cityline Media
0
साकुर पठार भागातील विविध विकास कामांचा शुभारंभ

संगमनेर संपत भोसले गेली चाळीस वर्षापासून संगमनेर तालुक्यात विकास झाला असे आभासी चित्र रंगवण्यात संगमनेर तत्कालीन राजकारणी अव्वल ठरले परंतु साकुर पठार भागातील वाडी-वस्त्यांवर अजूनही रस्ते,पाणी,व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणून-बुजून वंचित ठेवले गेले तुमचा फक्त मतासाठी वापर करून तुमच्यावर,दहशत दाखवली गेली.परंतु आता कुणाला ही घाबरू नका कुणाच्याही दबावाला आणि दहशतीला बळी न पडता महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा तालुक्यातील कुठलेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी आदिवासी बांधवांना नुकताच दिला.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येत असणाऱ्या सुतारवाडी पायरवाडी गि-हे वाडी  शेंडेवाडी अंतर्गत सतीचीवाडी गुंजाळवाडी पठार मांडवे शिंदोडी बिरेवाडी व जांबुत येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्याच वेळी हिवरगाव पठार येथे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते यावेळी मंचावर महायुतीचे बाबासाहेब कुटे बुवाजी खेमनर गुलाब भोसले किशोर खेमनर रौफ़ शेख इसाक पटेल सुभाष पेंडभाजे रवींद्र दातीर सुभाष भुजबळ अमृता कोळपकर अमित धुळगंड संदीप खिलारी शेंडेवाडी सरपंच कमल गावडे  उपसरपंच भाऊ उगले ज्ञानदेव वामन हिवरगाव पठारचे मा. सरपंच गजानन खाडे श्री.गोंदके नितीन डोळझाके कर्जुले पठारचे सरपंच किरण भागवत मा. सरपंच रवींद्र भोर मारुती आगलावे मांडवेचे उपसरपंच शब्बीर शेख धोंडीभाऊ वाडेकर बिरेवाडीचे मा.सरपंच बाबाजी सागर शिंदोडीचे पाटीलबा कुदनर विठ्ठल नाईकवाडी जांबुतचे संतोष शेटे बाळासाहेब झिटे राजेंद्र डोंगरे यांच्यासह विविध गावचे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 आमदार अमोल खताळ म्हणाले की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे  यांच्या माध्यमातून तुमच्या भागातील सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लागले जातील.जसे तुम्ही विधान सभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले असेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ खर्या आदिवासी बांधवांना मिळाला पाहिजे यासाठी महायुती पदाधिकाऱ्यांनी काम करावे वेळप्रसंगी या भागात एखादे शिबिर घ्यावे लागले तरी  तहसीलदार, व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फत यांच्यामार्फत शिबिरे घेऊन या भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शालेय दाखले,तसेच रेशनकार्ड,आणि शासकीय,योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत करावी तुमच्या वाडी वस्तीवरील विजेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून वीज समस्या सोडवली जाईल  पुरंदर धरणातील गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाला सूचना देऊन गळती थांबवली जाईल.
-जनतेला त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार-आ खताळ
 संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागात अनेक जण दहशत दादागिरी करत जनतेला त्रास देण्याचे काम करत आहे   त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल असे इशारा आमदार खताळ यांनी यावेळी दिला
-गावे दत्तक घेऊन विकास होत नाही.आ.खताळ
काहींनी याच पठार भागातील एक  गाव २५ वर्षापासून दत्तक घेतले होते.मात्र या गावाचा विकास करता आला नाही मग यांनी नेमका विकास केला तरी काय असा सवाल उपस्थित करत नुसती गावे दत्तक घेऊन गावांचा विकास होत नाही त्याला जनतेची कामे करावी लागते जनतेने संपूर्ण संगमनेर तालुकाच मला दत्तक दिला आहे.त्यामुळे या तालुक्याचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे हे मी माझ्या कामातून दाखवून देणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला
-साकुर पठार भागात लवकरच औद्योगिक वसाहत -आ खताळ
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी साकुर पठार भागात औद्योगिक वसाहत सुरू केली जाईल आणि त्या माध्यमातून या पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळून दिले जाणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!