हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा आणि आदिवासी समाजात वाद-शरद पवार

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांमुळे समाजा समाजात कटूता वाढत आहेत.सामाजिक प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले जात नसल्याने महाराष्ट्रातील सामाजिक विन उसवायला लागली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केले.
                  छाया रेखांकन-प्रकाश कदम 
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नाशिक येथील स्वामी नारायण बँकेट हॉलमध्ये झाले. दिवसभर चाललेल्या या शिबिरात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाने झाला. याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले,हैदराबाद गॅझेट मी वाचले असून या संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे बंजारा आणि आदिवासी समाजात वाद होऊ लागले आहेत.ओबीसी आणि मराठा या दोन समाजाचे प्रश्न सोडवायचे म्हणून शासनाने दोन समित्या नियुक्त केल्या आहेत.यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समिती स्थापन करण्यात आली असून

ओबीसी वगळता एकही अन्य जातीचा प्रतिनिधी या समितीत नाही. तर राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा समितीमध्ये एखादा अपवाद वगळता अन्य सर्व मराठा आहेत. यामुळे शासनाला प्रश्न सोडवायचे की कटूता वाढवायची असा संभ्रम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्कृष्टपणे शेती करतात येथे द्राक्ष,डाळिंब सर्वत्र जात असतात.शेतक-यांच्या प्रश्नांची जाणही येथील शेतकऱ्यांना आहे. शरद जोशी यांनी या जिल्ह्यातूनच शेतकरी संघटनेची उभारणी केली होती.
येथील मुख्य पीक असलेल्या कांद्याबाबत केंद्र शासनाचे धोरण योग्य नाही.केंद्र

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले.मागील आठ महिन्यात ११८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून आता शेतक-यांसाठी आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी वेगळ्या पद्धतीची मांडणी ही करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुण्या एकाचा पक्ष नाही तर राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन या शिबिराचा प्रारंभ झाला. शिबिरास प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,खा. सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, हेमंत टकले, बाळासाहेब पाटील, रोहिणी खडसे, एकनाथ खडसे, रोहित पवार,

खासदार बजरंग सोनवणे आदी मान्यवरांसह राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात प्रारंभी आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

वेगवेगळ्या नेत्यांनी शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शेतकरी प्रश्नावर आज जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. शिबिराचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी प्रश्नांचा मागोवा घेत सरकार उलथवून टाकण्याची ताकद

शेतकऱ्यांमध्ये असल्याचे व्यक्त केले. यापुढील काळात आपल्याला संघर्ष शिवाय पर्याय नाही. काम करणाऱ्याला बहुमान मिळेल, असेही त्यांनी सांगितले. महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या, स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राची भूमी पराक्रमाची भूमी राहिली आहे परिवर्तनाच्या चळवळीत अनेकांची नावे घेतली जातात. राज्य शासनाची कृती वेगळीच असून गावोगावी शाळा बंद होत असल्याने मुर्तीच्या शिक्षणात मोठी तफावत निर्माण झाली आहे. गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या

लाडकी बहीण योजनेच्या अनेक बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत.योजनेचा तळागाळातील महिलांना लाभ मिळतो का?याबाबतही जागरूकता होणे गरजेचे असल्याचे खडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

शिबिरात प्रा. सुभाष वारे यांनी संविधानापुढील आव्हाने व त्यावरील उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी संविधानातील वेगवेगळ्या तस्तुर्दीची माहिती उपस्थितांना दिली.शिबिरास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!