संगमनेर विशाल वाकचौरे नवरात्रीच्या मंगलमय पर्वानिमित्त शहरातील श्रीकृष्णा फाउंडेशन व भगवती एज्युकेशन सेंटर, मालदाड रोड संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने "जागर स्त्री शक्तीचा – खेळ पैठणीचा" हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी या विशेष कार्यक्रमात इयत्ता ८,९,१० वी. सेमी व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता ११-१२ वी विज्ञान शाखेच्या शिक्षिकांचा सहभाग होता. विविध खेळांच्या माध्यमातून शिक्षिकांनी आपली कला, उत्साह आणि टीम स्पिरिट सादर केली.स्पर्धेत विजयी ठरलेल्या सौ.भाग्यश्री मॅडम यांना मानाचा बहुमान म्हणून पैठणी श्रीकृष्णा फाउंडेशन व भगवती एज्युकेशन सेंटरच्या सौ.अनुराधा रच्चा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी शिक्षिकांना सुंदर समई भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना प्रतिसाद देत मनोबल वाढवले.अकॅडमीचे संचालक. संदीप रच्चा यांनी खेळांचे नियम व अटी स्पष्ट करून मार्गदर्शन केले.
या उपक्रमात सौ.विद्या मॅडम, सौ. सुरेखा मॅडम, सौ. रूपाली मॅडम, सौ. श्वेता मॅडम, सौ. भाग्यश्री मॅडम, सरला मॅडम, गितांजली मॅडम व प्रज्ञा ताई यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेश आहेर यांनी केले तर यशस्वीतेसाठी श्रीनिवास यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी विजेत्या सौ. भाग्यश्री मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना उपवासाचे फराळ देण्यात आले.
एकंदरीत, हा उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांमधील आपुलकी, आदर व प्रेरणेला चालना देणारा ठरला.
